Featured slider साहित्य

अर्धशतकी जश्‍न-ए-राहत

Written by shekhar patil

समकालीन शायरीमधील आघाडीचे नाव असणारे डॉ. राहत इंदोरी यांच्या काव्य प्रवासाला ५० वर्षे झाल्यानिमित्त नुकताच त्यांच्याच शहरात एक जंगी मुशायरा झाला. जावेद अख्तर, कुमार विश्‍वास यांच्यासारख्या दिग्गजांपासून ते आमच्या जळगाव जिल्ह्यातील जुबेर अली ताबीश यांच्यासारख्या नव्या पातीने राहत साहेबांच्या सृजनाला काव्यरूपी सलाम केला. इंदूरकरांनी या मुशायर्‍याला एखाद्या क्रिकेट सामन्यापेक्षाही जास्त गर्दी करून आपल्या लाडक्या सुपुत्राचे तोंड भरून कौतुक केले. राहत जनाब हे मीर, गालीब, इकबाल वा फैज यांच्या उंचीचे कवी नव्हेत. अगदी त्यांचेच समकालीन असणारे बशीर बद्र, मुनव्वर राणा वा निदा फाजली हे देखील त्यांच्यापेक्षा निश्‍चितच उजवे आहेत. तथापि, शायरीच्या सादरीकरणात राहतजींची बरोबरी कुणी करू शकत नाही हे देखील तितकेच खरे ! त्यांचे काव्य हे विलक्षण रसरशीत व उर्जावान तर आहेच पण याला अतिशय नाट्यमय शैलीत सादर करण्याची त्यांची पध्दत ही त्याला नवीन आयाम प्रदान करणारी ठरली आहे. ख्यातनाम कवि डॉ. कुंवर बेचैन यांच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास ”कई बार ऐसा लगता है कि यह अज़ीम शायर अपने लफ़्ज़ों के जरिये पेंटिंग कर रहा है, उनमें अपने भावों और विचारों के रंग भरकर सामने ला रहा है । राहत भाई को हम केवल सुनते ही हों, ऐसा नहीं है, उनकी शायरी दिखाई भी देती है । वे जो कुछ कहना चाहते हैं, उसे चित्रित कर देते हैं ।” अर्थात ते शायरीचे ‘बेस्ट परफॉर्मर’ आहेत. अत्यंत खटकेबाज पध्दतीत सादर केलेले त्यांचे शेर, नज्म आणि गझल या कोणत्याही मैफिलीत आकर्षणाच्या केंद्रस्थानी असतात. ते आपल्या जगावेगळ्या सादरीकरण शैलीने रसिकांना अक्षरश: मंत्रमुग्ध करतात. आजच्या पिढीच्या भाषेत बोलायचे तर राहतजींच्या शायरीमध्ये एक जबरदस्त अ‍ॅटीट्युड आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ते वर्तमानावरही बेधडक भाष्य करतात. याचमुळे-

सभी का खून है शामील इस मिट्टी मे
किसी के बाप का हिंदोस्ता थोडी है ॥

या त्यांच्या कधीतरी म्हटलेल्या ओळी आजदेखील तितक्याच प्रासंगीक वाटतात. तर-

सरहद पर तनाव है क्या
जरा पता तो करो चुनाव है क्या ||

या त्यांच्या काव्यपंक्ती तर अलीकडच्या राजकीय स्थितीला अतिशय चपखलपणे लागू होतात. याच प्रमाणे राहत साहेबांनी वेळोवेळी अतिशय ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतल्याचे दिसून येते. बर्‍याच महत्वाच्या मुद्यांवर अनेकदा कवि मंडळी गुळमुळीत भूमिका घेत असतांना राहतजींचा हा स्पष्टवक्तेपणा निश्‍चितच उठून दिसतो.

बहुआयामी प्रतिभेची जन्मजात देणगी लाभलेल्या राहतजींचा जन्म मध्यप्रदेशातील इंदूर येथे झाला. या शहरानेच त्यांना सर्व काही दिले. याचमुळे त्यांनी आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने इंदोरी हे उपनाम लाऊन या प्राणप्रिय शहराच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. शालेय वयापासूनच चित्रकलेची आवड लागलेले राहतजी हे कधी काळी इंदूरमधील आघाडीचे साईन-बोर्ड पेंटर म्हणून ख्यात होते. यानंतर देवी अहिल्या विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. ते नेमके काव्याकडे कसे वळले याची कथादेखील जगावेगळी आहे. राहतजी हे युवावस्थेत असतांना इंदूर शहरातील एका मुशायर्‍यात ख्यातप्राप्त शायर जानिसार अख्तर यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी गेले असतांना त्यांनी आपल्याला देखील शायर बनण्यासाठी काय करावे लागेल अशी त्यांना विचारणा केली. यावर अख्तर यांनी तुला पाच हजार अशआर तोंडपाठ असतील तर शायरी आपोआप येईल असे सांगितले. यावर राहतजी खुश झाले. कारण त्यांना त्याच्यापेक्षा कितीतरी अशआर कंठस्थ होते. येथूनच त्यांचा काव्यप्रवास सुरू झाला. वयाच्या अवघ्या एकोणाविसाव्या वर्षी त्यांची काव्ययात्रा सुरू झाली असून ती गत पाच दशकांपासून रसिकांना अव्याहतपणे मंत्रमुग्ध करत आहे. ऐन भरात असतांना ते तासन्तास कोणत्याही मैफिलीत रंग भरत असत. भारताच नव्हे तर जगातील अनेक देशांमधील हजारो मुशायर्‍यांना त्यांच्या काव्याने चार चांद लावले आहेत. याचमुळे आज त्यांचे चाहते जगभरात आहेत. सोशल मीडियात त्यांच्या काव्यपंक्ती नेहमीच भाव खातात. अर्थात, जुन्यांसोबत नवी पिढीदेखील त्यांच्यावर जाम फिदा आहे.

( जश्‍न-ए-राहत कार्यक्रमात सादर केलेली डॉक्युमेंटरी खाली दिलेली आहे.)

उर्दू शायरीच्या पारंपरीक प्रतिमासृष्टीत राहत साहेबांनी अतिशय मनभावन सृजन केले आहे. यात अर्थातच प्रेम हे केंद्रस्थानी असले तरी अन्य मानवी भावनांना त्यांनी विलक्षण समर्पक पध्दतीत अभिव्यक्त केले आहे. यासोबत त्यांनी बेरोजगारी, धार्मीक तेढ, राजकीय संधीसाधूपणा, दांभीकता, धर्माच्या नावावरील अधर्म यांच्यावरदेखील भाष्य केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राहतजींच्या शायरीमध्ये प्रचंड आत्मविश्‍वास आढळून येतो. जीवनात कितीही संकटे आली तरी यावर मात करून उभी राहण्याची जिद्द त्यांच्या काव्यातून आपल्याला आढळून येतो. हा कवि अन्याय सहन करत नाही. तो गरीब असला तरी स्वाभीमानी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तो अन्यायाने पिचून न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याचे धाडस दाखवतो.

तूफानों से आँख मिलाओ,
सैलाबों पर वार करो ।
मल्लाहों का चक्कर छोड़ो,
तैर के दरिया पार करो ॥

अशा प्रकारचा दुर्दम्य आशावाद हा राहतजींच्या सृजनात अनेक ठिकाणी आढळतो.

झूठी बुलंदियों का धुँआ पार कर के आ
क़द नापना है मेरा तो छत से उतर के आ ॥

सोने का रथ फ़क़ीर के घर तक न आयेगा
कुछ माँगना है हमसे तो पैदल उतर के आ ॥

असो की,

शाखो से टुट जाये वो पत्ते नही है हम
आंधियो से कहो की औकात मे रहे ॥

या काव्यपंक्ती खुद्दारी दर्शविणार्‍या आहेत. हीच विलक्षण अकड त्यांना अन्य शायरांपासून वेगळी करणारी आहे. ते दु:ख कुरवाळत नाहीत. तर यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे काव्य हे जीवंतपणाचा गौरव करणारे आहे. हे जीवन सुंदर असून आपण याचा अतिशय असोशीने आस्वाद घेतला पाहिजे असा ते संदेश देते. आणि त्यांचे काव्य म्हणजे निव्वळ शाब्दीक फुलोरा नव्हे. खुद्द राहतजींनी अनेकदा धार्मीक कट्टरतेविरूध्द आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. खुद्द मुस्लीम समुदायातील गैर प्रकारांनाही त्यांनी अनेकदा लक्ष्य केले आहे. तर अलीकडे राजकारणात आलेल्या संकुचीत विचारांवरही ते आपल्या काव्यातून कडाडून टीका करत असतात. त्यांनी चित्रपटांसाठी निवडक गाणीदेखील लिहली आहेत. मात्र या क्षेत्रात त्यांना हवे तितके यश मिळाले नाही हेदेखील नाकारता येणार नाही. गत पाच दशकांपासून शायरीच्या क्षेत्रातील हा बुलंद आवाज भविष्यातही त्याच तडफेने सृजन करेल ही अपेक्षा अनाठायी नाही. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

डॉ. राहत इंदोरी यांची अफलातून सादरीकरण शैली खालील व्हिडीओजमध्ये आपल्याला अनुभवता येईल.

खाली राहत इंदोरी यांच्या गाजलेल्या निवडक गझल आणि शेर दिलेले आहेत.

अगर ख़िलाफ़ हैं होने दो जान थोड़ी है
ये सब धुआँ है कोई आसमान थोड़ी है

लगेगी आग तो आएँगे घर कई ज़द में
यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है

मैं जानता हूँ के दुश्मन भी कम नहीं लेकिन
हमारी तरहा हथेली पे जान थोड़ी है

हमारे मुँह से जो निकले वही सदाक़त है
हमारे मुँह में तुम्हारी ज़ुबान थोड़ी है

जो आज साहिबे मसनद हैं कल नहीं होंगे
किराएदार हैं ज़ाती मकान थोड़ी है

सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिन्दोस्तान थोड़ी है

——————-

लोग हर मोड़ पे रुक-रुक के संभलते क्यों हैं
इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों हैं

मैं न जुगनू हूँ, दिया हूँ न कोई तारा हूँ
रोशनी वाले मेरे नाम से जलते क्यों हैं

नींद से मेरा त’अल्लुक़ ही नहीं बरसों से
ख्वाब आ आ के मेरी छत पे टहलते क्यों हैं

मोड़ होता है जवानी का संभलने के लिए
और सब लोग यहीं आके फिसलते क्यों हैं

———————

दिलों में आग लबों पर गुलाब रखते हैं
सब अपने चेहरों पे दोहरी नका़ब रखते हैं

हमें चराग समझ कर बुझा न पाओगे
हम अपने घर में कई आफ़ताब रखते हैं

————————-

गुलाब ख़्वाब दवा ज़हर जाम क्या-क्या है
मैं आ गया हूँ बता इन्तज़ाम क्या-क्या है

फक़ीर शेख कलन्दर इमाम क्या-क्या है
तुझे पता नहीं तेरा गुलाम क्या क्या है

अमीर-ए-शहर के कुछ कारोबार याद आए
मैँ रात सोच रहा था हराम क्या-क्या है

—————————

बन के इक हादसा बाजार में आ जाएगा,
जो नहीं होगा वो अखबार में आ जाएगा
चोर उचक्कों की करो कद्र, की मालूम नहीं,
कौन, कब, कौन सी सरकार में आ जाएगा

—————————

झूठों ने झूठों से कहा है सच बोलो
सरकारी ऐलान हुआ है सच बोलो

घर के अंदर झूठों की एक मंडी है
दरवाजे पर लिखा हुआ है सच बोलो

—————————–

सवाल घर नहीं बुनियाद पर उठाया है
हमारे पाँव की मिट्टी ने सर उठाया है

हमेशा सर पे रही इक चटान रिश्तों की
ये बोझ वो है जिसे उम्र-भर उठाया है

मिरी ग़ुलैल के पत्थर का कार-नामा था
मगर ये कौन है जिस ने समर उठाया है

यही ज़मीं में दबाएगा एक दिन हम को
ये आसमान जिसे दोश पर उठाया है

बुलंदियों को पता चल गया कि फिर मैं ने
हवा का टूटा हुआ एक पर उठाया है

महा-बली से बग़ावत बहुत ज़रूरी है
क़दम ये हम ने समझ सोच कर उठाया है

———————–

उँगलियाँ यूँ न सब पर उठाया करो
उँगलियाँ यूँ न सब पर उठाया करो
खर्च करने से पहले कमाया करो

ज़िन्दगी क्या है खुद ही समझ जाओगे
बारिशों में पतंगें उड़ाया करो

दोस्तों से मुलाक़ात के नाम पर
नीम की पत्तियों को चबाया करो

शाम के बाद जब तुम सहर देख लो
कुछ फ़क़ीरों को खाना खिलाया करो

अपने सीने में दो गज़ ज़मीं बाँधकर
आसमानों का ज़र्फ़ आज़माया करो

चाँद सूरज कहाँ, अपनी मंज़िल कहाँ
ऐसे वैसों को मुँह मत लगाया करो

—————————

आँख में पानी रखो होंटों पे चिंगारी रखो,
ज़िंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो,
एक ही नदी के हैं ये दो किनारे दोस्तो,
दोस्ताना ज़िंदगी से मौत से यारी रखो।

——————

फूलों की दुकानें खोलो, खुशबू का व्यापार करो
इश्क़ खता है तो, ये खता एक बार नहीं, सौ बार करो

—————–

मैं लाख कह दूँ कि आकाश हूँ ज़मीं हूँ मैं
मगर उसे तो ख़बर है कि कुछ नहीं हूँ मैं

———————-

सिर्फ खंजर ही नहीं आँखों में पानी चाहिए,
ए खुदा दुश्मन भी मुझको खानदानी चाहिए ॥

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment