Featured slider साहित्य

क्रांती स्वप्नाचा ‘पाश’

Written by shekhar patil

विख्यात पंजाबी कवि अवतारसिंग संधू उर्फ ‘पाश’ यांचा आज स्मृती दिन. आपल्या काव्यातून क्रांतीचे स्फुल्लींग चेतवणार्‍या व भगतसिंगांना शब्दांमधून समजून सांगणार्‍या पाश यांना भगतसिंग यांच्याच हौतात्म्य दिनी खलिस्तानवादी अतिरेक्यांनी गोळ्या झाडून संपविले. मात्र गोळ्यांनी व्यक्ती भलेही मारला जात असला तरी त्याचे विचार कधी नष्ट होत नाहीत. किंबहुना काळाच्या ओघात यांना अजून धार चढते. पाश यांच्या बाबतही हेच झालेय. त्यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या दहशतवाद्यांची कुणालाही आठवण नसली तरी पाश यांचे काव्य काळाच्या सर्व कसोट्यांवर टिकून अजरामर बनले आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पश्‍चिम बंगालमधील नक्षलबारी या लहानशा गावात १९६७ साली झालेल्या उठावाला खूप महत्व आहे. येथून सुरू झालेल्या सशस्त्र क्रांतीच्या ठिणगीने पुढे अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. बंदुकीच्या नळीतून क्रांतीचा जन्म होत असल्याचा विचार हा परकीय असला तरी यात सर्वहारा वर्गाच्या हिताला प्राधान्य दिले असल्यामुळे हा विचार देशातील काही भागात रूजला. अनेक पिढ्यांना नक्षलबारीच्या संघर्षाने प्रभावित केले. आज एकविसाव्या शतकातील भांडवलदारी समाजव्यवस्थेत साम्यवादाचा विचार कालबाह्य होऊ लागला असला तरी काही भागांमध्ये अजूनही याला प्रमाण मानणारी जनता उराशी क्रांतीचे स्वप्न बाळगून आहेत. हिंसेच्या मार्गाने क्रांतीच्या मार्गावरून जाणारा हाच विचार पोरसवदा अवतारसिंग संधू यांना भावला. अर्थात, त्यांनी क्रांतीसाठी शस्त्र उचलले नाही, तर आपल्या काव्यातून याला जगापर्यंत पोहचवले.

१९५० साली पंजाबातील तलवंडी सलेम येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाश यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच काव्य क्षेत्रात आपली चमक दाखविण्यास प्रारंभ केला होता. यातच वर नमूद केल्यानुसार नक्षलबारी येथील उठावाचा त्यांच्या मनावर अमीट परिणाम झाला. यामुळे ते डाव्या विचारांकडे झुकले. शेवटपर्यंत त्यांनी याच विचाराची पताका मोठ्या अभिमानाने मिरवली. मात्र याची त्यांना जबर किंमतदेखील मोजावी लागली. १९६९ साली त्यांना एका कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून कारागृहाची हवा खावी लागली. दरम्यान, ‘बीच का रास्ता नही होता’ या त्यांच्या काव्य संग्रहाने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडीत काढले तरी प्रकाशकाने त्यांना एक पैसादेखील दिला नाही. यामुळे एकीकडे प्रसिध्दी संपादन करत असतांना त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातील अडचणी दुर झाल्या नाहीत. तथापि, यामुळे नाऊमेद न होत पाश यांनी क्रांतीचा अविरत घोष कायमच ठेवला.

फाळणीमुळे होरपळलेल्या पंजाबमध्ये हरीत क्रांतीमुळे पुन्हा एकदा सुबत्ता आली. मात्र यासोबत समाजातील विषमतादेखील वाढली. एकीकडे जमीनदारांच्या हातात पैसा खेळू लागला तर दुसरीकडे शेत मजूर आणि अन्य शोषीत घटकांच्या जीवनात आशेची तिरीपदेखील आली नाही. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील हे भेसूर चित्र पाश यांच्या सृजनातून दाहक ठिणग्यांच्या स्वरूपात जगासमोर आले. त्यांची कविता ही अगदी साध्या-सोप्या शब्दांमध्ये थेट भेदक सत्य सांगणारी आहे. यात शब्दबंबाळपणा नाहीय. खरं तर, त्यांच्या उपमा आणि प्रतिमा या सर्वसामान्य शेतकरी व शेतमजुरांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत आहेत. त्यांचे काव्य एकीकडे विलक्षण ज्वालाग्रही तर तितकेच हळूवारही आहे. पाश यांनी आपले काव्य बहुतांश मुक्तछंदात लिहले. सत्तरच्या दशकात पंजाबात धार्मिक उन्मान चरमोत्कर्षावर पोहचला. याचा भीषण परिणाम ऐंशीच्या दशकाच्या प्रारंभी ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या माध्यमातून समोर आला. इंदिराजी गांधी यांची हत्या आणि त्यानंतर देशभरातील शिखांच्या शिरकाणामुळे जनमानस ढवळून निघाले. या प्रचंड प्रक्षोभक वातावरणात पाश यांनी धार्मिक कट्टरतेवर आपल्या काव्यातून जोरदार हल्लाबोल केला. खलीस्तानी दहशतवादी आणि त्यांना खतपाणी घालणार्‍या राजकारण्यांवर जोरदार प्रहार केला. १९८५ साली ते अमेरिकेला गेले. तेथून ‘अँटी ४७’ या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी खलीस्तानवादी चळवळीला प्रखर विरोध केला. यानंतर १९८८ मध्ये ते आपल्या गावी आले असतांना खलीस्तानवादी दहशतवाद्यांनी पाश यांची गोळ्या झाडून हत्या केली.

२३ मार्च १९८८ रोजी आपल्या गावातील शेतातल्या विहिरीवर आंघोळीसाठी जाणार्‍या पाश यांच्या पाठीवर खलीस्तानवाद्यांनी गोळ्या झाडल्या. समोरून आले असले तर कदाचित ते या कविच्या डोळ्याला डोळा देखील भिडवू शकले नसते. ज्या ‘एके-४७’ रायफलच्या हिंसेला प्रत्युत्तर म्हणून पाश ‘अँटी-४७’ हे मासिक चालवत होते. त्याच पाश यांच्या पाठीवर भेकडांनी ‘एके-४७’चे मॅगेझिन रिकामे केले, किती हा काळाचा क्रूर आघात. . .मात्र गोळ्या झाडणार्‍या भेकडांना आज कुणी ओळखतही नसले तरी अवतारसिंह संधू उर्फ पाश आपल्या शब्दांनी, तेजस्वी काव्यातून जिवंत आहेत. अर्थात शरीररूपी पाश काळाच्या पडद्याआड गेले असले तरी त्यांचे विचार आजही आपल्याला अस्वस्थ करतात.

पाश यांच्या सृजनातून सामंतवादी शोषक वर्गावर असूड ओढण्यात आले आहेत. तर दलीत, शोषीत वर्गाविषयी आत्यंतिक करूणा त्यांच्या काव्यातून स्त्रवली आहे. त्यांनी सातत्याने मानवतावादी विचारांना सर्वतोपरी मानले.वास्तविक पाहता, आज डावी विचारधारा क्षीण झालेली आहे. आजच्या भांडवलशाही व्यवस्थेत हा विचार अप्रासंगीक ठरू पाहत आहे. मात्र असे असले तरी पाश यांची कविता आजही ताजी व खरं तर आजच्या विषमतेवर भेदक भाष्य करणारी वाटते. जिथेही क्रांती हा शब्द येतो तिथे पाश आठवल्याशिवाय राहत नाही.

आज पाश यांना जाऊन साडे तीन दशके होत असतांनाही त्यांची लोकप्रियता अबाधित आहे. खरं तर ती वृध्दींगत झालीय. भगतसिंह हे क्रांतीचे प्रतीक असतील तर पाश यांच्या कविता क्रांतीचा जयघोष करणार्‍या आहेत. त्यात मातीचा सुगंध, सर्वहाराच्या व्यथा-वेदना, वंचितांचे दु:ख आणि अर्थातच विलक्षण आशावाद देखील आहे. ‘मै घास हू’ ही त्यांची कविता याच दुर्दम्य आकांक्षेचे प्रतिक आहे. सोशल मीडियाच्या उदयानंतर तर पाश हे डिजीटल सेलिब्रिटी बनले आहे. आपण एकविसाव्या शतकात वावरत असलो तरी भगतसिंह यांच्या क्रांतीचा उद्देश आणि पाश यांचा आक्रोश आजही प्रासंगीक आहे. कारण भगतसिंहांच्या हौतात्म्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्यातून सामाजिक न्याय आणि समान संधी आजही मिळाली असल्याचे कुणी म्हणू शकणार नाही. तर, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विषमता आणि धार्मिक उन्मादाच्या विरूध्द उभे ठाकलेल्या पाश यांचा आक्रोश हा आजच्या परिस्थितीलाही लागू होतो.

पाश यांच्या अनेक कविता गाजल्या आहेत. आज एकविसाव्या शतकातही ते तितकेच लोकप्रिय आहेत. यातील सबसे खतरनाक ही कविता तर आजही प्रचंड लोकप्रिय आहे. पाश यांच्या सर्व कविता पंजाबीत असल्या तरी त्यांना हिंदीतही मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. अमृता प्रितम यांच्यासोबत तेच अन्य भाषांमध्ये लोकप्रिय असणारे पंजाबी साहित्यीक मानले जातात. पाहूया त्यांच्या काही गाजलेल्या कविता.

सबसे खतरनाक

मेहनत की लूट सबसे ख़तरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे ख़तरनाक नहीं होती
ग़द्दारी और लोभ की मुट्ठी सबसे ख़तरनाक नहीं होती
बैठे-बिठाए पकड़े जाना बुरा तो है
सहमी-सी चुप में जकड़े जाना बुरा तो है
सबसे ख़तरनाक नहीं होता
कपट के शोर में सही होते हुए भी दब जाना बुरा तो है
जुगनुओं की लौ में पढ़ना
मुट्ठियां भींचकर बस वक़्त निकाल लेना बुरा तो है
सबसे ख़तरनाक नहीं होता

सबसे ख़तरनाक होता है मुर्दा शांति से भर जाना
तड़प का न होना
सब कुछ सहन कर जाना
घर से निकलना काम पर
और काम से लौटकर घर आना
सबसे ख़तरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना
सबसे ख़तरनाक वो घड़ी होती है
आपकी कलाई पर चलती हुई भी जो
आपकी नज़र में रुकी होती है

सबसे ख़तरनाक वो आंख होती है
जिसकी नज़र दुनिया को मोहब्बत से चूमना भूल जाती है
और जो एक घटिया दोहराव के क्रम में खो जाती है
सबसे ख़तरनाक वो गीत होता है
जो मरसिए की तरह पढ़ा जाता है
आतंकित लोगों के दरवाज़ों पर
गुंडों की तरह अकड़ता है
सबसे ख़तरनाक वो चांद होता है
जो हर हत्याकांड के बाद
वीरान हुए आंगन में चढ़ता है
लेकिन आपकी आंखों में
मिर्चों की तरह नहीं पड़ता

सबसे ख़तरनाक वो दिशा होती है
जिसमें आत्मा का सूरज डूब जाए
और जिसकी मुर्दा धूप का कोई टुकड़ा
आपके जिस्म के पूरब में चुभ जाए

मेहनत की लूट सबसे ख़तरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे ख़तरनाक नहीं होती
ग़द्दारी और लोभ की मुट्ठी सबसे ख़तरनाक नहीं होती ।

हम लडेंगे साथी

हम लड़ेंगे साथी, उदास मौसम के लिए
हम लड़ेंगे साथी, ग़ुलाम इच्छाओं के लिए

हम चुनेंगे साथी, ज़िन्दगी के टुकड़े
हथौड़ा अब भी चलता है, उदास निहाई पर
हल अब भी चलता हैं चीख़ती धरती पर
यह काम हमारा नहीं बनता है, प्रश्‍न नाचता है
प्रश्‍न के कन्धों पर चढ़कर
हम लड़ेंगे साथी

क़त्ल हुए जज़्बों की क़सम खाकर
बुझी हुई नज़रों की क़सम खाकर
हाथों पर पड़े घट्टों की क़सम खाकर
हम लड़ेंगे साथी

हम लड़ेंगे तब तक
जब तक वीरू बकरिहा
बकरियों का मूत पीता है
खिले हुए सरसों के फूल को
जब तक बोने वाले ख़ुद नहीं सूँघते
कि सूजी आँखों वाली
गाँव की अध्यापिका का पति जब तक
युद्ध से लौट नहीं आता

जब तक पुलिस के सिपाही
अपने भाइयों का गला घोंटने को मज़बूर हैं
कि दफ़्तरों के बाबू
जब तक लिखते हैं लहू से अक्षर

हम लड़ेंगे जब तक
दुनिया में लड़ने की ज़रूरत बाक़ी है
जब तक बन्दूक न हुई, तब तक तलवार होगी
जब तलवार न हुई, लड़ने की लगन होगी
लड़ने का ढंग न हुआ, लड़ने की ज़रूरत होगी

और हम लड़ेंगे साथी
हम लड़ेंगे
कि लड़े बग़ैर कुछ नहीं मिलता
हम लड़ेंगे
कि अब तक लड़े क्यों नहीं
हम लड़ेंगे
अपनी सज़ा कबूलने के लिए
लड़ते हुए जो मर गए
उनकी याद ज़िन्दा रखने के लिए
हम लड़ेंगे

हम लड़ेंगे साथी
हम लड़ेंगे साथी, उदास मौसम के लिये
हम लड़ेंगे साथी, गुलाम इच्छाओं के लिये
हम चुनेंगे साथी, जिंदगी के टुकड़े
हथौड़ा अब भी चलता है, उदास निहाई पर
हल अब भी चलता हैं चीखती धरती पर
यह काम हमारा नहीं बनता है, प्रश्‍न नाचता है
प्रश्‍न के कंधों पर चढ़कर

हम लड़ेंगे साथी
कत्ल हुए जज्बों की कसम खाकर
बुझी हुई नजरों की कसम खाकर
हाथों पर पड़े घट्टों की कसम खाकर

हम लड़ेंगे साथी
हम लड़ेंगे तब तक
जब तक वीरू बकरिहा
बकरियों का मूत पीता है
खिले हुए सरसों के फूल को
जब तक बोने वाले खुद नहीं सूंघते
कि सूजी आंखों वाली
गांव की अध्यापिका का पति जब तक
युद्व से लौट नहीं आता
जब तक पुलिस के सिपाही
अपने भाईयों का गला घोटने को मजबूर हैं
कि दफतरों के बाबू
जब तक लिखते हैं लहू से अक्षर

हम लड़ेंगे जब तक
दुनिया में लड़ने की जरुरत बाकी है
जब तक बंदूक न हुई, तब तक तलवार होगी
जब तलवार न हुई, लड़ने की लगन होगी
लड़ने का ढंग न हुआ, लड़ने की जरूरत होगी

और हम लड़ेंगे साथी
हम लड़ेंगे
कि लड़े बगैर कुछ नहीं मिलता

हम लड़ेंगे
कि अब तक लड़े क्यों नहीं

हम लड़ेंगे
अपनी सजा कबूलने के लिए
लड़ते हुए जो मर गए
उनकी याद जिंदा रखने के लिए
हम लड़ेंगे.

२३ मार्च

२३ मार्च
उसकी शहादत के बाद बाक़ी लोग
किसी दृश्य की तरह बचे
ताज़ा मुंदी पलकें देश में सिमटती जा रही झाँकी की
देश सारा बच रहा बाक़ी

उसके चले जाने के बाद
उसकी शहादत के बाद
अपने भीतर खुलती खिडकी में
लोगों की आवाज़ें जम गयीं

उसकी शहादत के बाद
देश की सबसे बड़ी पार्टी के लोगों ने
अपने चेहरे से आँसू नहीं, नाक पोंछी
गला साफ़ कर बोलने की
बोलते ही जाने की मशक की

उससे सम्बन्धित अपनी उस शहादत के बाद
लोगों के घरों में, उनके तकियों में छिपे हुए
कपड़े की महक की तरह बिखर गया

शहीद होने की घड़ी में वह अकेला था ईश्‍वर की तरह
लेकिन ईश्‍वर की तरह वह निस्तेज न था

उनके शब्द लहू के होते हैं

उनके शब्द लहू के होते हैं
जिन्होंने उम्र भर तलवार का गीत गाया है
उनके शब्द लहू के होते हैं
लहू लोहे का होता है
जो मौत के किनारे जीते हैं
उनकी मौत से जिंदगी का सफर शुरू होता है
जिनका लहू और पसीना मिटटी में गिर जाता है
वे मिट्टी में दब कर उग आते हैं

तुम्हारे बगैर

तुम्हारे बगैर मैं होता ही नहीं
तुम्हारे बगैर मैं बहुत खचाखच रहता हूं
यह दुनिया सारी धक्कम पेल सहित
बेघर पाश की दहलीजें लांघ कर आती-जाती है
तुम्हारे बगैर मैं पूरे का पूरा तूफान होता हूं
ज्वारभाटा और भूकंप होता हूं
तुम्हारे बगैर
मुझे रोज मिलने आते हैं आईंस्टाइन और लेनिन
मेरे साथ बहुत बातें करते हैं
जिनमें तुम्हारा बिलकुल ही जिक्र नहीं होता
मसलन: समय एक ऐसा परिंदा है
जो गांव और तहसील के बीच उड़ता रहता है
और कभी नहीं थकता
सितारे जुल्फों में गुंथे जाते
या जुल्फें सितारों में-एक ही बात है
मसलन: आदमी का एक और नाम मेनशेविक है
और आदमी की असलियत हर सांस के बीच को खोजना है
लेकिन हाय-हाय!
बीच का रास्ता कहीं नहीं होता
वैसे इन सारी बातों से तुम्हारा जिक्र गायब रहता है।

तुम्हारे बगैर
मेरे पर्स में हमेशा ही हिटलर का चित्र परेड करता है
उस चित्र की पृष्ठभूमि में
अपने गांव की पूरे वीराने और बंजर की पटवार होती है
जिसमें मेरे द्वारा निक्की के ब्याह में गिरवी रखी जमीन के सिवा
बची जमीन भी सिर्फ जर्मनों के लिए ही होती है।

तुम्हारे बगैर, मैं सिद्धार्थ नहीं, बुद्ध होता हूं
और अपना राहुल
जिसे कभी जन्म नहीं देना
कपिलवस्तु का उत्तराधिकारी नहीं
एक भिक्षु होता है।

तुम्हारे बगैर मेरे घर का फर्श-सेज नहीं
ईंटों का एक समाज होता है
तुम्हारे बगैर सरपंच और उसके गुर्गे
हमारी गुप्त डाक के भेदिए नहीं
श्रीमान बीडीओ के कर्मचारी होते हैं
तुम्हारे बगैर अवतार सिंह संधू महज पाश
और पाश के सिवाय कुछ नहीं होता

तुम्हारे बगैर धरती का गुरुत्व
भुगत रही दुनिया की तकदीर होती है
या मेरे जिस्म को खरोंचकर गुजरते अ-हादसे
मेरे भविष्य होते हैं
लेकिन किंदर! जलता जीवन माथे लगता है
तुम्हारे बगैर मैं होता ही नहीं।

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment