साहित्य

मिट्टी का तन, मस्ती का मन

Written by shekhar patil

बच्चनजींचे काव्य हे जीवनाचा उत्सव साजरा करणारे ठरले. जीवनातील प्रत्येक क्षण आसुसलेल्याप्रमाणे जगावा असा संदेश त्यांचे काव्य देते.

आज विख्यात हिंदी कवि हरिवंशराय बच्चन यांची जयंती. खुद्द बच्चनजींच्याच मते त्यांची सर्वोत्तम कृती ही महानायक अमिताभ यांच्या रूपाने एका ‘लीजंड’च्या स्वरूपात आपल्यासमोर आहेच. मात्र एकविसाव्या शतकातही त्यांचे काव्य अद्याप आपले महत्व टिकवून असल्याची बाब त्यांच्या कालजयी प्रतिभेची साक्ष देणारी आहे.

हरीवंशराय यांचे नाव येताच हटकून ‘मधुशाला’ आठविल्याशिवाय राहत नाही. मुळातच काही शतकानंतर ओमर खय्यामच्या रूबाईंचे इंग्रजीत भाषांतर झाल्यानंतर जगाला या सूफी कविची ओळख झाली. यानंतर अनेकांनी त्यांच्या काव्याचे भाषांतर केले वा त्यापासून प्रेरित होऊन सृजन केले. यातील दुसर्‍या प्रकारात हरिवंशरायजींची गणना होते. फारसी भाषेतील सूफी काव्यात वारंवार येणारे मदिरेचे उल्लेख हे गुढ आध्यात्मिक अनुभुतीशी संबंधीत आहेत. ईश्‍वरी आराधनेतून मिळणार्‍या परमानंदाची अनुभुती नेमकी कोणत्या शब्दात व्यक्त करावी? असा प्रश्‍न जवळपास प्रत्येक भाषेतल्या साधू-संतांना नेहमी भेडसावतो. खरं तर या अनादी प्रश्‍नाचे उत्तर कुणी समर्पक रितीने देऊ शकले नसले तरी प्रतिकांच्या माध्यमातून याला विविधांगी आयामांमधून व्यक्त करण्यात आले आहे. यात सूफींचे आवडते प्रतिक म्हणजे मदिरा आणि प्रेम होय. मात्र रूढ अर्थाने मानव पित असणारी दारू वा स्त्री-पुरूषातील पार्थिव प्रेमाशी याचा काही एक संबंध नव्हता. तर आराधनेतून मिळणार्‍या अत्युच्च आनंदाची स्थिती व्यक्त करण्यासाठी त्यांनी मदिरा, मदिरालय, मदिराक्षी आदींची प्रतिके घेतली. अजूनही याच प्रतिकांमध्ये सूफी काव्याचे सृजन होत आहे. ओमर खय्यामच्या रूबाईंना हिंदीत आणतांना बच्चनजींनी फक्त यातील भावार्थ घेतला. त्यांच्या प्रतिभेची झेप इतकी विलक्षण होती की, आज ऐशी वर्षानंतरही ‘मधुशाला’ आणि त्यांच्या नंतरच्या काव्य संग्रहाचे गारूड अद्याप कायम आहे. मुळातच सूफी हे भक्तीमार्गी असले तरी ते विद्रोही आहेत. यामुळे इस्लाममध्ये वर्जित असणार्‍या मदिरेला प्रतिक बनविण्याचे धाडस त्यांनी दाखविले. उघड प्रेमाची महती वर्णन करण्यासही ते कचरले नाहीत. मात्र बच्चनजींचा विद्रोह यापेक्षाही पुढील पातळीवरचा होता. यामुळेच त्यांच्या काव्यात-

धर्मग्रंथ सब जला चुकी है, जिसके अन्तर की ज्वाला
मन्दिर, मसजिद, गिरिजे सब को, तोड़ चुका जो मतवाला
पण्डित, मोमिन, पादरियो के फंदो को जो काट चुका है,
कर सकती है, आज उसी का स्वागत मेरी मधुशाला ॥

अशा पध्दतीचे ज्वालाग्रही विचार त्यांच्या सृजनातून जगासमोर आले. ओमर खय्याम वा अन्य सूफीदेखील दाखवू शकत नव्हते ते धाडस बच्चनजींनी दाखविले. त्यांनीदेखील भौतिक मदिरेचे प्रतिक घेत आणि धार्मिक रूढी परंपरांच्या ओझ्यापासून मुक्त होत जीवनाचा आनंद घेण्याचे आपल्या सृजनातून दर्शविले. बच्चनजींचे काव्य हे जीवनाचा उत्सव साजरा करणारे ठरले. जीवनातील प्रत्येक क्षण आसुसलेल्याप्रमाणे जगावा असा संदेश त्यांचे काव्य देते. अर्थात त्यांचा हा भोगवादी विचार तत्कालीन हिंदी काव्याच्या जाणीवांना धक्का देणारा ठरला. तोवर हिंदीत छायावादाचा बोलबाला असतांना बच्चनजींनी काव्याला पार्थिव स्वरूप दिले. यातूनच ते ‘हालावादा’चे प्रणेते बनले. सृजनाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या काव्यात अन्य अनुभतीदेखील आली. मात्र हरीवंशराय बच्चन हे खर्‍या अर्थाने पार्थिव जीवनाचा पुरस्कार करणारे कवि होत. या संदर्भात खुद्द त्यांनी-

मिट्टी का तन
मस्ती का मन,
क्षणभर जीवन
मेरा परिचय॥

अशी स्वत:ची करून दिलेली ओळख समर्पक नव्हे काय? हरिवंशरायजींच्या काव्याने जीवनाच्या अनेक अंगांना स्पर्श केले आहे. यात रात्रीचे विविध विलोभनीय रंग अनेकदा आपल्याला आढळून येतात. बच्चनजींच्या काव्यात रात्रीची धुंदी ही त्यांच्या अनेक कवितांमधून आपल्याला जाणवते. संपुर्ण आयुष्यात विपुल काव्य सृजन करणार्‍या हरिवंशराय यांच्या आत्मचरित्राच्या चार खंडांनादेखील अविस्मरणीय कलाकृतींचा दर्जा मिळाला आहे. त्यांचे काव्य उच्च दर्जाचे असले तरी ते लोकप्रिय ठरले. विशेषत: त्यातील गेयता ही अत्यंत विलोभनीय अशीच आहे. यामुळे ‘मधुशाला’च्या असंख्य आवृत्त्यांसोबतच याचे काव्यवाचन, त्याच्या ऑडिओ, सीडीज आदींनीही लोकप्रियतेचा मापदंड प्रस्थापित केला. त्यांच्या मुलाने जसा चित्रपटात ‘कल्ट’ प्रस्थापित केला अगदी त्याच प्रमाणे त्यांनी आधीच साहित्यात बच्चनपंथ निर्माण करून ठेवलाय. बाप-लेकात उत्तुंग प्रतिभाशक्ती असल्याचे हे एक दुर्मिळ उदाहरण होय.

त्यांच्या काही गाजलेल्या कविता:-

अग्निपथ

वृक्ष हों भले खड़े,
हों घने हों बड़े,
एक पत्र छाँह भी,
माँग मत, माँग मत, माँग मत,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

तू न थकेगा कभी,
तू न रुकेगा कभी,
तू न मुड़ेगा कभी,
कर शपथ, कर शपथ, कर शपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

यह महान दृश्य है,
चल रहा मनुष्य है,
अश्रु श्वेत रक्त से,
लथपथ लथपथ लथपथ,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

चाँदनी फैली गगन में, चाह मन में।

दिवस में सबके लिए बस एक जग है
रात में हर एक की दुनिया अलग है,
कल्‍पना करने लगी अब राह मन में;
चाँदनी फैली गगन में, चाह मन में।

भूमि के उर तप्‍त करता चंद्र शीतल
व्‍योम की छाती जुड़ाती रश्मि कोमल,
किंतु भरतीं भवनाएँ दाह मन में;
चाँदनी फैली गगन में, चाह मन में।

कुछ अँधेरा, कुछ उजाला, क्‍या समा है!
कुछ करो, इस चाँदनी में सब क्षमा है;
किंतु बैठा मैं सँजोए आह मन में;
चाँदनी फैली गगन में, चाह मन में।

चाँद निखरा, चंद्रिका निखरी हुई है,
भूमि से आकाश तक बिखरी हुई है,
काश मैं भी यों बिखर सकता भूवन में;
चाँदनी फैली गगन में, चाह मन में।

क्या भूलूँ, क्या याद करूँ मैं !

अगणित उन्मादों के क्षण हैं,
अगणित अवसादों के क्षण हैं,
रजनी की सूनी घड़ियों को
किन-किन से आबाद करूँ मैं!
क्या भूलूँ, क्या याद करूँ मैं!

याद सुखों की आँसू लाती,
दुख की, दिल भारी कर जाती,
दोष किसे दूँ जब अपने से
अपने दिन बर्बाद करूँ मैं!
क्या भूलूँ, क्या याद करूँ मैं!

दोनों करके पछताता हूँ,
सोच नहीं, पर मैं पाता हूँ,
सुधियों के बंधन से कैसे
अपने को आज़ाद करूँ मैं!
क्या भूलूँ, क्या याद करूँ मैं!

About the author

shekhar patil

Leave a Comment