Featured slider साहित्य

दुष्यंत कुमार : व्यवस्थेविरूध्दचा एल्गार

Written by shekhar patil

हिंदीतील सर्वश्रेष्ठ गजलकार दुष्यंतकुमार यांचा आज स्मृती दिन. रावांपासून ते रंकांपर्यंत आणि रस्त्यांपासून ते संसदेपर्यंत ज्यांच्या काव्यपंक्तींना वारंवार उदधृत केले जाते त्या दुष्यंत कुमार यांना जाऊन चार दशकांपेक्षा जास्त कालखंड उलटला तरी त्यांचे काव्य आजही प्रासंगीक वाटते. किंबहुना आजच्या दाहक वास्तवावर त्यांचे शब्द हे चपखलपणे लागू होतात.

खरं तर, संपूर्ण जगभरात गत शतकातील सहाव्या दशकात विविध क्षेत्रांमध्ये बंडखोरीचे वारे वाहू लागले होते. दुसर्‍या महायुध्दातील विनाशानंतर जागतिक सत्तासंघर्षातील बदललेल्या समीकरणांमध्ये तरूणाईची घुसमट होऊ लागली होती. अखेर याचा स्फोट होऊन याचे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रतिबिंब उमटले. सारेच काही नाकारणार्‍या हिप्पी संस्कृतीपासून ते कला वा साहित्याच्या विविध शाखांमध्ये हे बदल दिसून आले. भारतातही स्वातंत्र्योत्तर कालखंडातील दोन दशकांच्या वाटचालीचे वैफल्य साठोत्तरी बंडखोरीतून प्रकट झाले. तर पॉप कल्चरमध्ये थोड्या उशीरा म्हणजे सत्तरच्या दशकात याचा उद्रेक झाला. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदींच्या बजबजपुरीतील आणीबाणीच्या दमनपर्वाने तरूणाई संतप्त झाली. याच कालखंडात रूपेरी पडद्यावर अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनची दणक्यात एंट्री झाली. दाहक वास्तवाने त्रासलेल्या जनतेला आभासी का होईना पण एक महानायक मिळाला. याच कालखंडात दुष्यंत कुमार यांनी आपल्या काव्यातून वर्तमानावर स्फोटक भाष्य केले. अर्थात पडद्यावरील अमिताभ तर साहित्यातील दुष्यंत कुमार यांच्या दुकलीने या कोलाहलपर्वास अतिशय समर्थपणे अभिव्यक्त केले असे आपण नि:संदिग्धपणे म्हणू शकतो. एकीकडे आणीबाणीतल्या वरवंट्यामुळे भल्याभल्यांनी मौन बाळगले असतांना स्वत: शासकीय चाकरी करणार्‍या दुष्यंत कुमार यांनी थेट इंदिरा गांधींनाच लक्ष्य केले.

एक गुड़िया की कई कठपुतलियों में जान है,
आज शायर ये तमाशा देख कर हैरान है ।
मुझमें रहते हैं करोड़ों लोग चुप कैसे रहूं
हर गजल अब सल्तनत के नाम एक बयान है।

यातून इंदिराजी आणि त्यांच्या चमच्यांना टोला मारत विद्रोहाचा शंखनादही करण्यात आला आहे. आता गमतीशीर योगायोग पहा. इंदिराजींप्रमाणे हुकुमशाही पध्दतीने राज्य कारभार चालवणार्‍या विद्यमान सत्ताधार्‍यांनाही दुष्यंतजींच्या या ओळी चपखल बसतात.

कैसे कैसे मंज़र सामने आने लगे हैं
गाते गाते लोग चिल्लाने लगे हैं ।
अब तो इस तालाब का पानी बदल दो
ये कँवल के फूल कुम्हलाने लगे हैं ॥

आता यातील कमळाच्या उपमेचा योगायोग हा वर्तमानातील विरोधाभासावर विलक्षण समर्पक पध्दतीत भाष्य करणारा आहे. बर्‍याचशा प्रतिभावंतांना अल्पायुष्याचा शाप असतो. दुष्यंतजीदेखील अवघे ४२ वर्षे जगले. मात्र यातही त्यांनी हिंदीला ललामभूत ठरणार्‍या सृजनाची निर्मिती केली. १३ सप्टेंबर १९३३ रोजी उत्तरप्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात जन्मलेल्या दुष्यंतकुमार त्यागी यांनी आकाशवाणीतील आपल्या नोकरीत अनेक लोकप्रिय कार्यक्रमांची निर्मिती केली. दिग्गज हिंदी साहित्यीक कमलेश्‍वर यांच्याशी त्यांचे प्रगाढ संबंध होते. याच प्रमाणे अलाहाबाद येथील वास्तव्यात त्यांची हरिवंशराय बच्चन यांच्याशी जवळीक होती. आता योगायोग असा की, रूपेरी पडद्यावर त्यांचेच पुत्र अमिताभ यांचा उदय त्यांना अनुभवता आला. दिवार चित्रपट पाहून त्यांनी अमिताभला पत्रदेखील लिहले. यात ते म्हणतात की, ”मैं तो (हरिवंशराय) बच्चनजी की रचनाओं को ही उनकी संतान माने हुए था। मुझे क्या पता था की, उनकी एक संतान का कद इतना बड़ा हो जाएगा कि मैं उसे खत लिखूंगा और उसका प्रशंसक हो जाउंगा !” अर्थात, रूपेरी पडद्यावरील या नायकाला पुढे ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा लाभली. तर अकाली मृत्यू होऊनदेखील दुष्यंतजी आपल्या रचनांमधून अमर झाले. त्यांनी एक कंठ विषपायी (पद्य नाटक), और मसीहा मर गया (नाटक), सूर्य का स्वागत, आवाज़ों के घेरे, जलते हुए वन का बसंत (सर्व कविता संग्रह); छोटे-छोटे सवाल, आँगन में एक वृक्ष, दुहरी जिंदगी (सर्व कादंबर्‍या), मन के कोण (लघुकथा संग्रह), साये में धूप (गजल) आदींसह गद्य व पद्य या दोन्ही प्रकारांमध्ये अतिशय समर्थपणे सृजन केले. तथापि, दुष्यंतजींना ओळखले जाते ते त्यांच्या गजलांसाठी.

दुष्यंतजींना लिखाणास प्रारंभ केला तेव्हा हिंदी गजलचे क्षेत्र सुरा-सुंदरी आणि उर्दूप्रमाणे पारंपरीक प्रतिमांमध्येच गुरफटलेले होते. त्यांनी गजलचा हा फॉर्म बर्‍याच प्रमाणात उद्ध्वस्त केला. गजलेवरील पारशी व उर्दूचा प्रभाव आणि प्रतिमांना तोडण्याचे धाडस त्यांनी दाखविले. एका अर्थाने गजलेचे दुष्यंतजींनी गजलेचा भारतीयकरण केले. यामुळे त्यांच्या गजलांमध्ये गंगा, हिमालय, ऋतुंभरा आदी भारतीय प्रतिमा आढळून येतात. त्यांचा कित्ता नंतरच्या बहुतांश हिंदी-उर्दू शायरांनी गिरविला. आज अतिशय सुलभ-सोप्या आणि प्रवाही हिंदीत अतिशय सशक्त गजल लिहली जात आहे. याचा पाया दुष्यंतजींनी रचला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या गजलमध्ये प्रेम आहे अन् विरहदेखील. काही प्रमाणात पारंपरीक पध्दतीत त्यांची अभिव्यक्ती झालेली आहे. तथापि, सत्तरच्या दशकातील अस्वस्थ वर्तमानाला शब्द साज चढविलेली त्यांची गजल ही तुफान लोकप्रिय ठरली. पारंपरीक व्यवस्थेवर जोरदार हल्लाबोल करणारे दुष्यंतजींचे शब्द हे विलक्षण आशावादी आहे. अर्थात, दाहक वर्तमानातूनच समानतावादी युग येणार असल्यावर त्यांचा ठाम विश्‍वास आहे. त्यांचे शब्द हे परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आपल्याला प्रेरीत करतात.

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए ।
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ॥

हे असो की,

रहनुमाओं की अदाओं पे फिदा है दुनिया
इस बहकती हुई दुनिया को संभालो यारो ।
कैसे आसमान में सुराख हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो ॥

या शब्दांनी अगदी मुर्दाड मनांनाही चेतवण्याचे काम केले आहे.

वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है
माथे पे उसके चोट का गहरा निशान है।
सामान कुछ नहीं है फटेहाल है मगर
झोले में उसके पास कोई संविधान है॥

अशा शब्दांमधून त्यांनी संविधानवादी भारतीयत्वाला प्रखरतेने मांडले. दुष्यंतजींनी मुक्तछंदातील सृजन केले. तसेच प्रेमकविताही लिहल्या. मसान या चित्रपटात त्यांच्या कवितेतील-

तू किसी रेल सी गुजरती है
मैं किसी पुल सा थरथराता हूं

या काव्यपंक्ती समर्पकपणे वापरण्यात आल्या आहेत. आज हिंदी गजल अतिशय समृध्द आणि सकस बनलेली आहे. अनेक मातब्बर सशक्त गजल लिहत आहेत. तथापि, जगण्याचे सर्व प्रश्‍न आजदेखील कायम आहेत. खरं तर, दुष्यंतजींनी अनुभवलेल्या व्यवस्थेची पोलादी चौकट अजूनदेखील कायम आहे. सत्ताधार्‍यांची मगु्ररी, परिघावर फेकले गेलेल्या सर्वसामान्यांची अवस्थाही फारशी बदललेली नाही. यामुळे दुष्यंतकुमारजींचे काव्य आजही प्रासंगीक वाटते. एखाद्या साहित्यिकाला अजरामर करण्यासाठी हे नक्कीच पुरेसे आहे.

वाचा :- दुष्यंतजींच्या निवडक गजल

तुम्हारे पाँव के नीचे कोई ज़मीन नहीं
कमाल ये है कि फिर भी तुम्हें यक़ीन नहीं ॥

मैं बेपनाह अँधेरों को सुब्ह कैसे कहूँ
मैं इन नज़ारों का अँधा तमाशबीन नहीं ॥

तेरी ज़ुबान है झूठी जम्हूरियत की तरह
तू एक ज़लील-सी गाली से बेहतरीन नहीं ॥

तुम्हीं से प्यार जतायें तुम्हीं को खा जाएँ
अदीब यों तो सियासी हैं पर कमीन नहीं ॥

तुझे क़सम है ख़ुदी को बहुत हलाक न कर
तु इस मशीन का पुर्ज़ा है तू मशीन नहीं

बहुत मशहूर है आएँ ज़रूर आप यहाँ
ये मुल्क देखने लायक़ तो है हसीन नहीं

ज़रा-सा तौर-तरीक़ों में हेर-फेर करो
तुम्हारे हाथ में कालर हो, आस्तीन नहीं

================

आज सड़कों पर लिखे हैं सैकड़ों नारे न देख,
घर अंधेरा देख तू आकाश के तारे न देख।

एक दरिया है यहां पर दूर तक फैला हुआ,
आज अपने बाज़ुओं को देख पतवारें न देख।

अब यकीनन ठोस है धरती हकीकत की तरह,
यह हक़ीक़त देख लेकिन खौफ़ के मारे न देख।

वे सहारे भी नहीं अब जंग लड़नी है तुझे,
कट चुके जो हाथ उन हाथों में तलवारें न देख।

ये धुंधलका है नज़र का तू महज़ मायूस है,
रोजनों को देख दीवारों में दीवारें न देख।

राख कितनी राख है, चारों तरफ बिखरी हुई,
राख में चिनगारियां ही देख अंगारे न देख।

===============

वो आदमी नहीं है मुकम्मल बयान है
माथे पे उसके चोट का गहरा निशान है ॥

वे कर रहे हैं इश्क़ पे संजीदा गुफ़्तगू
मैं क्या बताऊँ मेरा कहीं और ध्यान है ॥

सामान कुछ नहीं है फटेहाल है मगर
झोले में उसके पास कोई संविधान है ॥

उस सिरफिरे को यों नहीं बहला सकेंगे आप
वो आदमी नया है मगर सावधान है ॥

फिसले जो इस जगह तो लुढ़कते चले गए
हमको पता नहीं था कि इतना ढलान है ॥

देखे हैं हमने दौर कई अब ख़बर नहीं
पैरों तले ज़मीन है या आसमान है ॥

वो आदमी मिला था मुझे उसकी बात से
ऐसा लगा कि वो भी बहुत बेज़ुबान है ॥

=============

मत कहो आकाश में कोहरा घना है,
यह किसी की व्यक्तिगत आलोचना है।

सूर्य हमने भी नहीं देखा सुबह का,
क्या कारोगे सूर्य का क्या देखना है।

हो गयी हर घाट पर पूरी व्यवस्था,
शौक से डूबे जिसे भी डूबना है।

दोस्तों अब मंच पर सुविधा नहीं है,
आजकल नेपथ्य में सम्भावना है.

===========

ये जो शहतीर है पलकों पे उठा लो यारो
अब कोई ऐसा तरीका भी निकालो यारो

दर्द ए दिल वक़्त पे पैगाम भी पहुंचाएगा
इस कबूतर को जरा प्यार से पालो यारो ॥

लोग हाथों में लिए बैठे हैं अपने पिंजरे
आज सैयाद को महफिल में बुला लो यारो

आज सीवन को उधेड़ो तो जरा देखेंगे
आज संदूक से वो खत तो निकालो यारो ॥

रहनुमाओं की अदाओं पे फिदा है दुनिया
इस बहकती हुई दुनिया को संभालो यारो ॥

कैसे आसमान में सुराख हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो

लोग कहते थे कि ये बात नहीं कहने की
तुमने कह दी है तो कहने की सजा लो यारो ॥

==================

हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए

आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी,
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए ॥

हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गांव में,
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए ॥

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ॥

मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए ॥

About the author

shekhar patil

1 Comment

Leave a Comment