Featured slider

अपना खाका लगता हूं…एक तमाशा लगता हूं

Written by shekhar patil

विख्यात शायर जॉन एलिया यांची आज जयंती. उत्तरप्रदेशातल्या अमरोहा येथील जन्मभूमि तर फाळणीनंतर पाकिस्तानातील कराची ही कर्मभूमि असणार्‍या या महान शायराने जीवनातील विविध अंगांवर केलेले भाष्य अजरामर झाले आहे. आज जयंतीनिमित्त जॉन एलिया यांचे सोशल मीडियात होत असलेले स्मरण हे त्यांच्या काव्यातील कालातीत सौंदर्याला मिळालेली दाद होय. अनेक विख्यात शायरांच्या नशिबात नसणारा हा दुर्मिळ योग एलिया यांची महत्ता अधोरेखित करणारा आहे. त्यांच्या लिखाणात एक प्रकारचा अक्खडपणा आहे. डॉ. कुमार विश्‍वास यांच्या मते तर ते शायरीतील चे ग्वेरा आहेत. त्यांच्यातील हा विद्रोह अनेक पिढ्यांना भावणारा ठरला आहे. जॉन एलिया यांना सोशल मीडियातील एखाद्या संक्षिप्त पोस्टमध्ये बसवणे फारसे सोपे नाही. आणि अर्थातच प्रदीर्घ लिहण्याची फुर्सत आयुष्यात सध्या तरी नसल्यामुळे त्यांच्या काव्याचा थोडक्यात रसास्वाद घेणे इतकेच आपण करू शकतो.
आपला परिचय करून देतांना ते म्हणतात….
अपना खाका लगता हूं
एक तमाशा लगता हूं
आईनों को जंग लगा
अब मैं कैसा लगता हूं
अब मैं कोई शख्स नहीं
उसका साया लगता हूं
उस से गले मिल कर खुद को
तनहा तनहा लगता हूं

आपल्या काव्यातून जॉन एलिया यांचे तत्वचिंतन स्पष्टपणे दिसून येते. खालील काव्यपंक्ती याचीच साक्ष देणार्‍या आहेत.

शर्मिंदगी है हम को
बहुत हम मिले तुम्हें
तुम सर-ब-सर ख़ुशी थे
मगर ग़म मिले तुम्हें
मैं अपने आप में न मिला
इस का ग़म नहीं
ग़म तो ये है के
तुम भी बहुत कम मिले तुम्हें

निदा फाजली यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर ‘तुम्हारी कब्रपर मै फातीहा पढने नही आया’ असे म्हणत विलक्षण भावविभोरपणे बाप व मुलातील नात्याला शब्दांमध्ये गुंफले होते. जॉन एलिया यांनी मात्र ‘बाबा मै बडा नही हो सका’ या फक्त एका ओळीत वडिलांना आपल्या आयुष्याची शोकांतिका सांगितली. त्यांचा हा जुमलादेखील मोठ्या चर्चेचा विषय ठरला. यापुढील ओळी त्यांनी कधीच लिहल्या नाही. त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. असो. जॉन एलिया यांच्या काही काव्यपंक्ती.

मै भी बहुत अजीब हुं
इतना अजीब हुं की बस
खुद को तबाह कर लिया
और मलाल भी नहीं
—–
महक उठा है आँगन इस ख़बर से
वो ख़ुशबू लौट आई है सफ़र से
——
अब वो घर इक वीराना था
बस वीराना ज़िंदा था
सब आँखें दम तोड़ चुकी थीं
और मैं तन्हा ज़िंदा था
—–
कितने ऐश उडाते होंगे
कितने इतराते होंगे
जाने कैसे लोग वो होंगे
जो उस को भाते होंगे
—–
ख़ामोशी कह रही है,
कान में क्या
आ रहा है मेरे,
गुमान में क्या
यूं जो तकता है,
आसमान को तू
कोई रहता है,
आसमान में क्या
—-
तुम हक़ीक़त नहीं हो
हसरत हो
जो मिले ख़्वाब में
वो दौलत हो
तुम हो ख़ुशबू के
ख़्वाब की ख़ुशबू
और इतने ही
बेमुरव्वत हो

About the author

shekhar patil

Leave a Comment