ओहोटीच्या आरंभातला सूचक इशारा

‘प्रत्येक क्रियेची तेवढ्याच तीव्रतेची विरूध्द दिशेने प्रतिक्रिया उमटतेच’…न्यूटनच्या या तिसर्‍या नियमाची व्याप्ती ही फक्त पदार्थविज्ञानाइतपतच मर्यादीत नाही. जीवनाच्या विविध अंगांवर या नियमाचे प्रतिबिंब उमटले आहेच. राजकारणातही याची अनेक उदाहरणे आपल्या भोवती आढळून येतात. गत अडीच-तीन वर्षांपासून लाट, सुनामी, झंझावात आदी नावांनी कौतुक करण्यात आलेल्या राजकीय विचारधारेचा सुरू झालेला परतीचा प्रवास आता याच नियमाची प्रचिती दर्शविणारा ठरणार आहे. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, राजकारण Tagged with: , ,

गूढ छायाचित्रकार व्हिवियन मायर

काही प्रतिभावंतांच्या नशिबी मरणोत्तर प्रसिध्दी आणि लौकीकाचा योग लिहिलेला असतो. गॅलेलिओ, व्हिन्सेंट व्हॅन गॉग, काफ्का, एमिली डिकीन्सन आदींच्या नशिबात हा कुयोग होता. मराठी भूमितले याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी होत. बहिणाबाईंचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांनी थोडेसे दबकतच आचार्य अत्रे यांना आपल्या आईच्या कविता दाखविल्या; तेव्हा अत्रेंनी उत्स्फुर्तपणे हे ‘शंभर नंबरी सोने’ असल्याचे सांगितले. यानंतर काय झाले हा इतिहास आपल्यासमोरच आहे. बहिणाबाईंच्या प्रतिभेची पारख करणारे आचार्य अत्रे हे स्वत: उत्तुंग प्रतिभावंत होते. मात्र जॉन मलूफ नावाच्या एका सर्वसामान्य तरूणाने व्हिवियन मायर या आपले आयुष्य जवळपास अज्ञात अवस्थेत व्यतीत करणार्‍या महिलेच्या छायाचित्रांचा अनमोल खजिना जगासमोर आणण्याचे महत्वाचे कार्य केले. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी

आता लेकीच तारणहार

ऑलिंपीकमधील भारतीय चमूची सुमार कामगिरी विनोदाचा विषय झालेला असतांनाच साक्षी मलिक या तरूणीने कुस्तीत कांस्यपदक जिंकून तर पी.व्ही. सिंधूने उपांत्य फेरीत धडक मारल्यामुळे या अपयशाच्या गडद अध्यायाला चंदेरी किनार लाभली आहे असे म्हणणे सार्थ ठरणार आहे. पुढे वाचा !

Posted in क्रीडा, चालू घडामोडी Tagged with:

मेघदूत विथ व्हर्च्युअल क्लाऊड !

आषाढाच्या आगमनानंतर महाकवि कालिदासांच्या विश्‍वविख्यात ‘मेघदूत’ची आठवण अवचितपणे होणारच. खरं तर अगदी ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ याच रोजी संकल्प करूनही यावर लिहता न आल्याने आज संगणकावर टाईप करतोय. असो. अनेक शतके उलटली तरी मेघदुताची लोकप्रियता जराही ओसरली नाही ही कविकुलगुरूंच्या उत्तुंग प्रतिभेची किमयाच होय. प्रेमीजनांची विरह वेदना ही अनेक अजोड कलाकृतींचा गाभा असल्याचे आपल्याला दिसून येते. जगात आजवर असंख्य प्रकारांनी, अनेक भाषांमध्ये याच प्रकारची अभिव्यक्ती झालीय. मात्र मेघदूत एकमेवाद्वितीयच! यात विरहाग्नीत जळणारा यक्ष आणि त्याच्या पत्नीसोबत संदेश वहनाची जबाबदारी असणार मेघ हादेखील प्रमुख पात्र आहे. खरं तर तोदेखील या महाकाव्याचा नायक वा सहनायकच!
पुढे वाचा !

Posted in साहित्य

तीन शब्दात पत्ता: एक अफलातून फंडा !

तंत्रज्ञानाने आपले जीवन आमूलाग्र बदलून टाकले आहे. प्रत्येक क्षणाला यात काही तरी नवीन घडत आहे. अशाच एका नाविन्याचा ध्यास घेतलेल्या कंपनीने संपुर्ण जगातील कोणत्याही कान्याकोपर्‍याला अवघ्या तीन शब्दांच्या पत्त्यामध्ये अचूकपणे व्यक्त करण्याची प्रणाली विकसित केली आहे. काय आहे हे तंत्रज्ञान? याचा दैनंदिन जीवनात काय उपयोग होणार? आपण यातील एखादा पत्ता ‘खरेदी’ करू शकणार का? या सर्व बाबींचा उहापोह करणारा हा लेख. पुढे वाचा !

Posted in विज्ञान-तंत्रज्ञान

फुटबॉलवेडाची अदभूत प्रेरणादायी गाथा !

‘कोपा अमेरिका’ आणि ‘युरो’ या स्पर्धांचा ‘इफेक्ट’ आपल्या भोवतीदेखील जाणवत आहे. आज सकाळीच चिरंजीवांनी ‘‘पप्पा आपण फुटबॉल खेळूया!’’ हा हुकुम सोडल्यावर ही बाब प्रकर्षाने जाणवली. झाले…सर्व तयारी करून आम्ही मैदानावर पोहचलो तर मुलाची मित्रमंडळीदेखील जमली होती. आता बच्चे कंपनीच्या खेळात माझी भुमिका ही अर्थातच अंपायरची म्हणजे भांडणे सोडविण्यापासून ते एखाद्या निर्णयापर्यंत मर्यादीत नसते. तर क्रिकेट खेळतांना हक्काचा बॉलर वा फिल्डर म्हणूनदेखील ते माझा दम काढतात. आज मला अंपायरसोबत गोलकिपरची भुमिका पार पाडावी लागली. दहा-बारा वर्षे वयोगटातील माझ्या मुलाची ‘कंपनी’ अगदी सज्ज तयारी करून आली होती. पालकांनी अत्यंत कौतुकाने फुटबॉल खेळायला जाणार्‍या आपल्या मुलांना पिण्याच्या पाण्यापासून ते शूज, स्पोर्टस वेअर आदींची व्यवस्था करून दिली होती. मी मैदानावर असल्याने इतर पालक तसे निर्धास्त होते. काही वेळानंतर पाणी पिण्याच्या निमित्ताने मी बाजूला उभा राहिलो अन् हरवून गेलो. पुढे वाचा !

Posted in क्रीडा Tagged with:

हॅकरची हाकाटी…सपशेल खोटी !

सध्या सोशल मीडियावर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या कराची येथील बंगल्यावरून भारतातील काही ठिकाणांसह अन्यत्र सातत्याने करण्यात आलेल्या कॉल्सची माहिती फिरत आहे. यामध्ये मनीष लिलाधर भंगाळे या कथित इथिकल हॅकरने हॅकींग करत यात महाराष्ट्रातील एक दिग्गज नेता असल्याचा गौप्यस्फोट केल्याचा दावा केला आहे. मात्र या संदर्भातील प्राथमिक माहिती ही विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे. मी स्वत: याबाबत अध्ययन केल्यानंतर याबाबतच ठाम निष्कर्ष आपल्यासमोर सादर करत आहे. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with:

ट्विटरचे दशक

विश्‍वविख्यात मायक्रो ब्लॉगिंग सेवा ट्विटर आता दहा वर्षांची झालीय. दहा वर्षे हा तसा फारसा मोठा कालखंड नसतांनाही ट्विटरने जगावर पाडलेली छाप ही विलक्षण अशीच मानावी लागणार आहे. दशकपुर्तीनिमित्त या साईटचा इतिहास, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेतल्यास फारसे अप्रस्तुत ठरणार नाही. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with:

ही वेळ कुबेरांची खिल्ली उडविण्याची नाही !

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मागे घेतलेल्या ‘असंतांचे संत’ या अग्रलेखावरून गदारोळ उडाला आहे. मराठीच नव्हे तर कदाचित भारतीय पत्रकारितेच्या इतिहासात ही एक अभुतपुर्व घटना मानली जात आहे. यावरून ‘लोकसत्ता’सह कुबेर यांच्यावर होणारी चौफेर टीका स्वाभाविक आहे. मात्र या प्रकरणाच्या अनेक पैलूंचे अध्ययन केल्यानंतर हा केवळ काही काळापुरता टिका-टिपण्णी अथवा खिल्ली उडविण्यापुरता मुद्दा नसल्याचे कुणालाही स्पष्टपणे दिसून येऊ शकते. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, पत्रकारिता Tagged with:

अशी असेल अँड्रॉईड ‘एन’ !

गुगलने जगभरातील डेव्हलपर्ससाठी आपल्या अँड्रॉईड या ऑपरेटींग सिस्टीमची ‘एन’ ही आगामी आवृत्ती खुली केली आहे. यामुळे प्रत्यक्षात ही प्रणाली सादर होण्याआधीच थोडेफार तांत्रिक कौशल्य असणारे याचा वापर करू शकणार आहेत. अर्थात यात नेमके कोणते फिचर्स आहेत? याचा उलगडाही यामुळे झाला आहे. पुढे वाचा !

Posted in विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with: ,

आओ की कोई ख्वॉब बुने…!

आज साहिरचा जन्मदिवस. आपले आयुष्य समृध्द करणार्‍यांपैकी हा एक. कविता आणि गीत या दोन्ही प्रकारांमध्ये समान ताकदीने सृजन करणारा अन् याहूनही महत्वाची बाब म्हणजे आयुष्य आपल्याच धुंदीत जगणारा एक मनस्वी, कलंदर. पुढे वाचा !

Posted in चित्रपट, साहित्य Tagged with:

व्यापार भावनांचा अन् शब्दांचा !

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच एका कार्यक्रमात जाहीररित्या गाळलेले अश्रू वादात सापडले आहेत. ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीने तर ओबामांनी तिखट कांद्यांला डोळ्यासमोर धरून अश्रू काढल्याचा आरोप केला आहे. यानंतर याबाबत विविध थिअरीज मांडण्यात येत आहेत. बर्‍याच जणांनी त्यांची तुलना हिटलरच्या नक्राश्रूंसोबत केली आहे. बहुतांश लोकांना त्यांच्या अश्रूंमध्ये काही तरी रहस्य अथवा कट-कारस्थान असल्याचा भास होत आहे. चार वर्षांपुर्वीची शिकागोमधील दुर्घटना आठवून रडणारे ओबामा ‘इसीस’च्या अमेरिकेतील शिरकावाबद्दल का बोलत नाहीत? असा अनेकांनी सवाल केला आहे. यावर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. असो. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी

परराष्ट्रनितीच्या ‘मोदी पॅटर्न’ची पायाभरणी ?

कोणत्याही क्षेत्रात ‘टायमिंग’ हे अत्यंत महत्वाचे असते. याचा विचार करता अलीकडच्या कालखंडात अचूक वेळ साधण्यासाठी ख्यात असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच दिवसात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या आपल्या कायम तणावग्रस्त संबंध असणार्‍या शेजारी राष्ट्रांना दिलेल्या भेटींनी भल्याभल्यांना बुचकळ्यात टाकले आहे. यातील अकस्मातपणे पार पाडलेल्या लाहोर भेटीचे कवित्व दीर्घ काळापर्यंत टिकणार आहे. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, राजकारण Tagged with:

ज्ञानाचा मुक्तस्त्रोत

सायबरविश्‍वातील बहुतांश घडामोडी या आपल्या आयुष्याशी अत्यंत निगडीत असल्याचे दिसून येते. दररोज तंत्रज्ञानातील घडामोडी समजून घेतांना मला याची जाणीव प्रकर्षाने होते. याचा विचार करता अलीकडची एक घटना ही अतिशय लक्षणीय असल्याचे माझे मत आहे. अमेरिकेतील विख्यात ‘खान अकॅडमी’ने आता हिंदीतली आपली सेवा सुरू केली आहे. आता आपण तातडीने यात काय ते विशेष? असे म्हणाल. मात्र मुळात मोठी व्याप्ती असणारा हा विषय मुळातून समजून घेतल्यास आपल्याला ही ऐतिहासिक घटना असल्याचे समजेल. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with:

युध्दच नव्हे तर तहदेखील जिंकणारा महानेता !

राजकारणाला अनेकदा युध्दाची उपमा दिली जाते. आणि युध्दात जय-पराजयाइतकाच महत्वाचा असणारा घटक म्हणजे तह होय. मराठी वीर युध्दात जिंकतात मात्र तहात हरतात असे अनेकदा म्हटले जाते. यात तथ्यदेखील आहे. इतिहासातील अनेक घटना याचीच ग्वाही देणार्‍या आहेत. याचा विचार करता गेल्या साडेचार दशकांपेक्षा जास्त कालखंडाच्या राजकीय जीवनामध्ये काही लढायांमध्ये माघार घ्यावी लागली तरी प्रत्येक तहामध्ये कायम सरशी मिळवणारे देशातील एकमेव राजकारणी म्हणून आपल्यासमोर शरदचंद्र पवार यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव समोर येत नाही. पुढे वाचा !

Posted in आध्यात्म, पत्रकारिता, राजकारण Tagged with:

विक्रमादित्याची उपेक्षा

आपल्या पॉप कल्चरमध्ये प्रत्येक क्षेत्रांमधील नायकांना वलय मिळते. अगदी तंत्रज्ञानाचा विचार केला असता सत्या नादेला, सुंदर पिचाई आदींसारख्या व्यक्तीमत्वांचे गोडवे आपण कायम गात असतो. त्यांच्या भारतीयत्वाला विशेष करून गौरवाने नमुद करण्यात येते. मात्र याचप्रमाणे विज्ञान क्षेत्रातील मान्यवरांच्या पदरी पहिल्यापासूनच खूप उपेक्षा आहे. आज देशातील आघाडीच्या वैज्ञानिकांची नावे कुणालाही विचारली तरी चार-पाच लोकप्रिय नावांच्या पलीकडे आपली पोहच जात नाही. अगदी जागतिक पातळीवर विख्यात असणार्‍या भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांबाबतही हीच बोंब आहे. या पार्श्‍वभुमिवर विश्‍वविख्यात शास्त्रज्ञ तथा ‘नोबेल’ विजेते वेंकटरमन रामकृष्णन यांची ब्रिटनमधील ‘रॉयल सोसायटी’च्या अध्यक्षपदी झालेली निवडही फारशी लक्षवेधी ठरली नसल्याबाबत कोणतेही नवल वाटले नाही. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with:

मिट्टी का तन, मस्ती का मन

आज विख्यात हिंदी कवि हरिवंशराय बच्चन यांची जयंती. खुद्द बच्चनजींच्याच मते त्यांची सर्वोत्तम कृती ही महानायक अमिताभ यांच्या रूपाने एका ‘लीजंड’च्या स्वरूपात आपल्यासमोर आहेच. मात्र एकविसाव्या शतकातही त्यांचे काव्य अद्याप आपले महत्व टिकवून असल्याची बाब त्यांच्या कालजयी प्रतिभेची साक्ष देणारी आहे. पुढे वाचा !

Posted in साहित्य

मंथनाचे वर्तुळ पुर्ण व्हावे

विख्यात पाकिस्तानी चित्रपट दिग्दर्शक शोएब मन्सूर याच्या चित्रपटांचा मी निस्सीम चाहता आहे. त्याच्या ‘खुदा के लिये’ या आपल्याला अक्षरश: अंतर्मुख करणार्‍या चित्रपटात जीवन आणि धार्मिक ढवळाढवळीतील संघर्ष इतक्या भेदकपणे दिग्दर्शीत केलाय की असा चित्रपट पाकिस्तानसारख्या देशात बनू शकतो? यावर आपला विश्‍वास बसणार नाही. चित्रपटाचे कथानक साधे आहे. दोन गायक भाऊ जीवनात दोन वेगळ्या वाटेने जातात. एक अमेरिकेत संगीताचे उच्च शिक्षण घेण्यासाठी जातो आणि ९/११च्या प्रक्षुब्ध वातावरणात नाहक पकडला जातो. तर दुसरा प्रतिभावंत असूनही कट्टरपंथियांच्या संगतीत आल्यानंतर अंतर्बाह्य बदलतो. इस्लाममध्ये संगीत ‘हराम’ असल्याचे त्याच्या मनावर ठसविण्यात आल्यानंतर तो आपल्या गायकीचा त्याग करून कट्टर धार्मिक विचारानुसार जीवन व्यतीत करतो. यात शेवटच्या भागात धर्म आणि दैनंदिन जीवनातील निखळ आनंद याच्यावर न्यायालयात जी काही चर्चा रंगते ती तुम्ही स्वत:च पहावी अशी माझी इच्छा आहे. याचा सार एकच आहे की, धर्माने एखाद्याच्या वैयक्तीक जीवन आणि सामूहिक वर्तनात कितपर्यंत ढवळाढवळ करावी? यावर विचार करणे आवश्यक आहे. आज हे सारे आठविण्याचे कारण म्हणजे सद्यस्थितीत भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर आपल्या प्रतिभेची अमीट छाप उमटवणार्‍या ए. आर. रहेमान या संगीतकाराने आपल्या मनातील व्यक्त केलेली सल हेच होय. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी Tagged with:

अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिलीकॉन व्हॅलीतील दौर्‍यातील अनेक घटना आपल्यासमोर आल्याच. मात्र याच्या समांतर तीन बातम्या मला खूप महत्वाच्या वाटल्या. यातील पहिली बातमी म्हणजे गुगलने निवडक भारतीय रेल्वे स्थानकांवर मोफत हाय-स्पीड वाय-फाय पुरविण्याची घोषणा केली. मायक्रोसॉफ्टने भारतातील पाच लाख खेड्यांना स्वस्त दरात इंटरनेटचा पुरवठा करण्याची घोषणा केली. तर फेसबुकनेही ‘डिजीटल इंडिया’च्या रंगात रंगून आपल्या ‘फ्री बेसिक्स’ या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त भारतीयांना मोफत इंटरनेट पुरविण्याची ग्वाही दिली. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with:

अब्जाधिशांमधील तरूणोदय

‘फोर्ब्स इंडिया’ने जाहीर केलेल्या देशातील धनाढ्य मान्यवरांच्या यादीत बहुतांश नावे अपेक्षित असणारीच आहेत. मात्र यातील दोन नावांच्या समावेशाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ते आहेत फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स पोर्टलचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with: , ,

आता खासगी आयुष्यातही सरकार डोकावणार

नेट न्युट्रीलिटीच्या पाठोपाठ आता केंद्र सरकारने डिजीटल माहितीच्या सुरक्षिततेसाठी तयार केलेल्या ‘नॅशनल एनक्रीप्शन पालिसी’च्या मसुद्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान

पुन्हा सोनिया भरोसे

गत लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाची प्रचंड वाताहत झाल्यानंतर पक्षात खांदेपालट होणार असल्याची अधून-मधून चर्चा होत होती. यातच पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी यांची फेरनिवड करण्यात आल्याने या चर्चेला पुर्णविराम मिळाला असला तरी यातून कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता धुसरच वाटत आहे. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, राजकारण Tagged with: ,

एक झिंग एक हुरहूर !

शंभरातील नव्व्याण्णवांपैकी एक असण्यातील सुख घेण्याचे अनेक प्रसंग आयुष्यात आले. आपण ‘खास’ नसून ‘आम’ असल्याचे मानल्यास अनेक बारीक-सारीक प्रसंगांमध्ये अत्यानंदाचे क्षण उपभोगता येतात. मात्र काही खास क्षण फक्त कल्पनेतच शक्य असतात. म्हणजे उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्याप्रमाणे दैवी सूर नसला तरी त्यांच्या शागीर्दांच्या ताफ्यात सामील होण्याची लायकी आपली नक्की असल्याचे मला वाटते. मग गानकोकिळेच्या ‘अजीब दास्तॉं है ये….’ या गाण्यातल्या मनभावन कोरसमधील शेकडो आवाजांपैकी एक आपला असावा अशी आकांक्षा गैर नक्कीच नाही. दादा कोंडकेंच्या चित्रपटातील एखादे गावठी पात्र साकारण्याची संधी आपल्याला मिळावी असे मला खूप वाटते. ओशो जीवन रहस्य समजावून सांगत असतांना आपण त्यांच्या समोरच कोपर्‍यात कुठे तरी कानात प्राण साठवून श्रवण करावे हे स्वप्न सोडण्यास मी तयार नाही. पुढे वाचा !

Posted in अनुभव

आहे सुंदर तरीही…!

गुगल या तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपनीने नुकतीच केलेली फेररचना ही अनेकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे. मात्र नव्याने उदयास आलेल्या ‘अल्फाबेट’ समुहातील गुगलची धुरा सुंदर पिचाई यांच्या हातात देण्याची घोषणा ही भारतीयांना उभारी देणारी ठरली आहे. यामुळे सिलीकॉन व्हॅलीतील भारतीय सीईओंचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. हा निश्‍चितच भारतीय गुणवत्तेचा सन्मान आहे. मात्र पिचाई यांच्या वैयक्तीक यशाच्या पलीकडे पाहिले असता तंत्रज्ञान व विशेषत: ‘टेक व्हेन्चर्स’मध्ये भारतीयांना मोठा पल्ला गाठावयाचा असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with: ,

सलाम…कलाम !

भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने एक उत्तुंग व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रखर राष्ट्रभक्त, देशाला प्रगतीपथावर नेणारा वैज्ञानिक, भारताला महाशक्ती बनविण्याचा ध्यास घेणारा स्वप्नदर्शी आणि यासाठी मार्ग आखून देणारा शिक्षक, सकारात्मक जीवनशैलीचे चालते-बोलते ज्ञानपीठ असणारे कलाम यांच्या निधनानंतर अवघा देश ज्या पध्दतीने शोकसागरात बुडालाय ते पाहता स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात त्यांना अढळ स्थान मिळाल्याचे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी Tagged with:

सल्लूभाई धंदेवाला !

देशद्रोही याकूब मेमन याच्या फाशीबाबत आपली अक्कल पाजळत अभिनेता सलमान खान याने अचूक ‘टायमिंग’ साधले आहे. यामागे ‘बजरंगी भाईजान’ला लाभ होणार असल्याचे गणित असल्याची बाब स्पष्ट आहे. मात्र हे करत असतांना आपण समाजात दुहीचे बिज रोवत असल्याची जाणीव त्याला नसावी. अर्थात वाद निर्माण करणे आणि विनाशर्त माफी मागत मखलाशी करण्याचा राजकारण्यांचा ट्रेंड आता सेलिब्रिटींमध्येही बळावू लागला की काय? ही शंका येऊ लागली आहे. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, चित्रपट Tagged with:

नारायण मुर्तींचे अरण्यरूदन !

इन्फोसीसचे सहसंस्थापक तथा भारतीय आयटी आयकॉन एन. आर. नारायण मुर्ती यांनी भारतातातील अभ्यासक्रमांमध्ये संशोधन आणि कल्पकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. विशेषत: आयआयटी आणि आयआयएस आदींसारख्या जगविख्यात संस्थांनी भारताला अभिमान वाटावे असे काहीही दिले नसल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. यातून मुर्ती यांनी एका महत्वाच्या प्रश्‍नाला वाचा फोडली आहे. पुढे वाचा !

Posted in विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with:

शिवसेनेची संभ्रमावस्था

राज्याच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी विधीमंडळाच्या अधिवेशनातील पहिल्या टप्प्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखविलेली एकी तुटल्याचे संकेत मिळत असतांनाच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपले मौन तोडत फडणवीस सरकारची पाठराखण केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणारे ‘सामना’ सातत्याने भाजपविरोधी भुमिका घेत असतांना व विशेषत: विधीमंडळातही पक्षाचे आमदार सरकावर तुटून पडत असतांना ठाकरे यांच्या या पवित्र्याने शिवसेनेची संभ्रमावस्था उघड झाली आहे. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, राजकारण Tagged with:

राजकारण आणि प्रेम…सेम टू सेम !

‘‘अहो हे भाजपवाले विरोधात असतांना किती सोज्वळ वाटत होते किनई!’’-इति सौभाग्यवती.

मी- ‘‘ हो ना…अगदी चारित्र्यवान, देशप्रेमी, भ्रष्टाचारविरोधी, स्वच्छ प्रतिमेचे, खर्‍या अर्थाने निती-नियमांची चाड असणारे ! बरं एक सांग तुला तेव्हा केंद्रातील युपीएचे नेते तसेच राज्यातील आघाडीचे पुढारी कसे वाटत होते?’’

बायको- ‘‘ ते तर अगदी उन्मत्त वाटत होते हो! सत्तेच्या नशेत धुंद. मग्रूर, अहंकारी, भ्रष्टाचारी, जनतेच्या समस्यांपासून कोसो दूर, स्वत:च्या तोर्‍यात मग्न, सत्तालोलुप.’’ पुढे वाचा !

Posted in अनुभव, राजकारण

आता रंगणार खरा मुकाबला !

क्रिकेट हा खरं तर फलंदाजांचा खेळ म्हणून ख्यात झाला आहे. आजही महान क्रिकेटपटूंच्या नावांमध्ये बहुतांश बॅटसमनचीच नावे येतात. गोलंदाजास आधीच दुय्यम स्थान असतांना काही नियम त्यांच्या मुळावर येत होते. यापैकी एक म्हणजे ‘पॉवर प्ले’ होय. आता मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ‘आयसीसी’ने फलंदाजी करणार्‍या संघाला मिळणारा ‘पॉवर प्ले’ रद्द करत या नियमात बदल करून गोलंदाजांचा दिलासा दिला आहे. यामुळे मैदानावर फलंदाजांइतकीच गोलंदाजांनाही संधी मिळणार असल्याने क्रिकेटचा खेळ खर्‍या अर्थाने रंगतदार होण्याची शक्यता आहे. पुढे वाचा !

Posted in क्रीडा Tagged with:

आत्म्याची आर्त हाक अल्ला हू…अल्ला हू…!

आज विश्‍वविख्यात दिवंगत सूफी गायक उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या अत्यंत गाजलेल्या आणि माझ्या हृदयाला भिडलेल्या अल्लाहू…अल्लाहू या कव्वालीविषयी.

बहुतांश गाणी शरिराला आंदोलित करतात. संगीताचे हे पार्थिव रूप होय. आजचे लोकप्रिय वर्गवारीतील तसेच बहुतांश चित्रपट संगीतही याच प्रकारातील आहे. हे गाणे आपल्याला ठेका धरायला लावते. या गीत-संगीतामुळे आपल्या शरीर लहरी उत्तेजीत होतात. अर्थात ही ‘पॉप’ वर्गवारी. दुसरा प्रकार मनाच्या पातळीवरचा. हे संगीत आपल्या मनाला स्पर्श करते, आपल्याला भावविभोर करते. उत्तम गेयता, चपखल शब्द आणि तेवढ्याच तोलामोलाचे संगीत याची एकत्रित सरमिसळ असणारा हा प्रकार अभिजात म्हणून गणला जातो. तिसरा प्रकार आत्म्याला स्पर्श करणार्‍या संगीताचा. हे शरीर अन् मनाला नव्हे तर आपल्या थेट काळजाला स्पर्श करते. जगाच्या विविध भागांमध्ये डिव्होशनल, भक्तीसंगीत आदी नावांनी हे विपुल प्रमाणात आपल्याला आढळते. मात्र आज सूफी संगीतातील सरताज म्हणून ख्यात असणार्‍या गिताविषयी. पुढे वाचा !

Posted in साहित्य

संक्रमण कालखंडाचा नायक

आज आणीबाणीच्या चाळीशीबाबत व्यापक उहापोह करण्यात येत आहे. आणीबाणी आणि याच्या पश्‍चातच्या कालखंडाचे विविधांगी आकलन यातून आपल्यासमोर आले आहे. यावर येत्या काही दिवसांमध्ये लिहण्याचा विचार आहेच. मात्र आजच माजी पंतप्रधान व्हि.पी. सिंग यांचा जन्म दिनही आहे. साहजीकच आज त्यांच्याविषयी. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, राजकारण Tagged with:

पाऊस बहिणाबाईंच्या सृजनातला !

पावसाळा आल्यानंतर कवितांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होत असल्याबद्दल सोशल मीडियात मिश्कील प्रतिक्रिया उमटतात. वर्षा ऋतुत ‘उदंड जाहल्या कविता’ अशी म्हणण्याची वेळ येणार असल्याकडे याचा रोख असतो. यातील विनोदाचा भाग सोडून दिला तरी पावसाळा आणि काव्य सृजनाचे अगदी जवळचे नाते आहे हे कुणी नाकारू शकणार नाही. आणि पावसाळा आल्यानंतर बहिणाबाई चौधरी यांचे काव्य हटकून आठवणारच. आपला भोवताल व विशेषत: निसर्गाला डोळसपणे अनुभवत बहिणाबाईंनी मानवी जीवनातील विविध अंगांवर केलेले भाष्य मराठीत अजरामर झाले आहे. निसर्ग आणि जिवनानुभुती यांची तात्विक पातळीवरील सांगड त्यांच्या सृजनात आहे. साहजीकच त्यांच्या काव्यात पावसाचेही अनेक उल्लेख आहेत. पुढे वाचा !

Posted in साहित्य Tagged with:

गुगल बॉम्ब आणि धोक्याचा इशारा

गुगल इमेज सर्चमध्ये ‘टॉप इंडियन क्रिमिनल’ या शब्दांचा शोध घेतला असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा येत असल्याने सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. हा देशाचा अपमान असल्याने गुगलचा व्यापक पातळीवर विरोध करण्यात येत आहे. या प्रतिमा हटविण्याची मागणीदेखील करण्यात येत आहे. मात्र मुळातच हा खोडसाळपणा गुगलचा नसून या कंपनीच्या तंत्रज्ञानाला हवे तसे वापरून घेणार्‍या विकृती मनोवृत्तीचा आहे. आज याचाच वेध. पुढे वाचा !

Posted in चालू घडामोडी, राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान Tagged with: ,

ताजे लेख

फेसबुकगिरी

टिवटिवाट..


Tech Varta